@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Mulberry cultivation subsidy scheme, which is the most beneficial for farmers; know and get it. ] : शेतकऱ्यांना तुती लागवडीकरीता अनुदान देण्यात येते , सदर योजना बाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणुन घेवूयात ..
तुती लागवड अनुदान योजना : शेतकऱ्यांना तुती लागवड करीता नविन शेतकऱ्यांना 500/- रुपये भरुन तुती लागवड करीता नोंदणी करुन सभासद होता येते . अशा शेतकऱ्यांना अंडीपुंज अनुदान योजना , प्रशिक्षण , सिल्कसमग्र योजना अंतर्गत लाभ मिळतो. याशिवाय म.न.रे.गा या योजना अंतर्गत देखिल लाभ मिळवता येते .
प्रति लाभार्थी 1 एकर या प्रमाणे लाभ मिळेल , लाभार्थी निवड करीता सामाजिक आरक्षणाचा विचार केला जाईल . मनरेगा योजना अंतर्गत 3 वर्षांकरीता अकुशल मजुरी करीता 2,65,815/- रुपये तर कुशल मजुरी करीता 1,53,000/- रुपये अशी एकुण 4,18,515/- रुपये रक्कम दिले जाते .
तर सिल्कसमग्र योजना अंतर्गत तुती लागवड , किटक संगोपन गृह , सिचंन संच , कीटक संगोपन साहित्य , निर्जुंतुकीकरण करीता प्रति एकर 3,75,000/- तर अनुसुचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 4,50,000/- रुपये अनुदान दिले जाते .
अनुदानाचा लाभ कसा घ्यावा : सदर योजनांचा लाभ घेण्याकरीता आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा रेशीम कार्यालय , मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयास भेट द्यावे .
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !