राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना कामकाजास्तव देय असणारे दैनिक भत्यांमध्ये ( 7 व्या वेतन आयोगानुसार ) सुधारणा करणेबाबत IMP GR !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ IMP GR regarding revision in daily allowances payable to State officers/employees for work (as per 7th Pay Commission). ] : राज्य अधिकारी / कर्मचााऱ्यांना कामकाजास्तव देय असणारे दैनिक भत्यांमध्ये सातवा वेतन आयोगानुसार सुधारणा करणेबाबत , वित्त विभागांकडून 07.10.2022 रोजी सुधारित GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद आहे कि , राज्य सरकारी व इतर पात्र असणारे अधिकारी / कर्मचारी हे शासकीय कामकाजाकरीता दौऱ्यावर असताना , यांमध्ये मुंबई , दिल्ली , कोलकाता , बंगळून , हैद्राबाद या शहराकरीता हॉटेलमध्ये वास्तव्य केले असल्यास देय होणारे दैनिक भत्ता दरांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणाा करण्यात आलेली आहे .

एस -30 व त्या पेक्षा अधिक वेतनस्तर असणारे अधिकारी / कर्मचारी : अशांना प्रतिदिन 7500/- रुप्ये हॉटेल वास्तव्य भत्ता तर भोजन व संकीर्ण खर्च करीता 1200/- रुपये प्रतिदिन पेक्षा अधिक नाही .

हे पण वाचा :माहे मार्च 2025 चे वेतन देयक संदर्भातील महत्वपुर्ण सुचना ;

एस – 25 ते एस 29 दरम्यान वेतनस्तर असणारे अधिकारी / कर्मचारी : अशांना हॉटेल वास्तव्य करीता 4500/- रुपये प्रतिदिन हॉटेल भत्ता तर 1000/- रुपये प्रतिदिन पेक्षा अधिक नाही असे संकिर्ण खर्च भत्ता अनुज्ञेय करण्यात येते .

एस – 20 ते एस – 24 वेतनस्तर असणारे अधिकारी / कर्मचारी : अशांना प्रतिदिन 2250/- रुपये हॉटेल वास्तव्य भत्ता तर 800/- रुपये प्रतिदिन पेक्षा जास्त नाही असे संकिर्ण भत्ता दिला जातो .

एस – 19 व त्यापेक्षा कमी वेतनस्तर असणारे अधिकारी / कर्मचारी : अशांना 1000/- रुपये प्रतिदिन हॉटेल भत्ता तर 500/- रुपये पेक्षा अधिक नाही असे संकिर्ण भत्ता दिला जातो .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment