राज्यात CBSE अभ्यासक्रम अशा पद्धतीने केला जाईल लागु ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण तरतुदी !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ CBSE curriculum will be implemented in this manner in the state; Know some important provisions ] : राज्यामध्ये सीबीएसई अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 पासुन लागु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे .

सीबीएसई पॅटर्न टप्याटप्याने लागु केला जाणार असून ,सन 2025 पासुन इयत्ता पहिली करीता सदर सीबीएसई पॅटर्न लागु करण्यात येणार आहे . त्यानंतर सन 2026 मध्ये इयत्ता दुसरी , तिसरी , चौथी व सहावी करीता सीबीएसई अभ्यासक्रम लागु केला जाणार आहे .

तर सन 2027 पासुन इयत्ता 5 वी , 7 वी तसेच 9 वी व अकरावी करीता सीबीएसई अभ्यासक्रम लागु केला जाणार आहे . तर त्या पुढील वर्षी म्हणजेच सन 2028 पासुन इयत्ता 8 वी , 10 वी व इयत्ता 12 वी करीता सीबीएसई अभ्यासक्रम लागु केला जाणार आहे .

महत्वपुर्ण बाबी : सीबीएसई अभ्यासक्रम केंद्राच्या धर्तीवर राज्याकडून नविन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे . नविन शैक्षणिक धोरणानुसार स्किल वर आधारित अभ्यासक्रम निश्चित करण्यात येणार आहेत .

काही विषय मराठीतच : सीबीएसई अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातुन आहे , परंतु राज्य सरकारकडून लागु करण्यात येत असणारे सीबीएसई अभ्यासक्रमांमध्ये इतिहास , भुगोल हे विषय मराठी भाषेतच राहतील परंतु सदर विषयांची व्यापकता अधिक वाढवली जाणार आहे .

Leave a Comment