@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important GRs were issued in the case of state employees on 27.02.2025. ] : दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर जीआर पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.दहा टक्के वेतन वाढ : शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या सदर निर्णयानुसार , समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रम अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनातील माहे जानेवारी 2025 ते माहे मार्च 2025 या कालावधीमधील 10 टक्के वाढीच्या फरकाची रक्कम अदा करणे कामी रुपये 5,05,77,129/- रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
सदरचा निधी वितरीत करताना वित्त विभागाकडून नमुद करण्यात आलेल्या अटी / शर्तीची पुर्तता होईल , याकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .सदर शासन निर्णयाचा फायदा हा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत 5643 कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे .
02.वाहतुक भत्ता वाढ : अपंग समावेशित शिक्षण योजना ( प्राथमिक स्तर ) अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतुक भत्ता लागु करणेबाबत ,शालेय शिक्षण विभागांकडून निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , समग्र शिक्षा अभियान योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या 06 जिल्हा समन्वयक , 52 विशेष तज्ञ / समावेशित शिक्षक व 158 विशेष शिक्षक असे एकुण 216 कर्मचाऱ्यांना वित्त विभागच्या दिनांक 20 एप्रिल 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार वाहतुक भत्ता लागु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
यानुसार माहे ऑगस्ट 2024 ते माहे फेब्रुवारी 2025 या कालावधीमधील वाहतुक भत्ता अदा करणेकामी एकुण 44,03,700/- रुपये इतका निधी वितरीत करण्यातस मान्यता देण्यात येत आहे .
या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !