@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ rain upate news ] : मकर संक्रांती नंतर देशात थंडीचे प्रमाण कमी होताना दिसून येत आहे , तर तापमानात वाढ होत आहे . परिणामी वातावरणात पाण्याचे बाष्पीभवन होवून , पावसाची स्थिती निर्माण झालेली आहे .
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता : भारतीय हवामान खात्याकडून दिलेल्या अंदाजानुसार पुढच्या 48 तासांमध्ये लडाख व जम्मू व काश्मिरमध्ये अतिमुसळधार पावसासह बर्फवृष्टीची होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तर पुढील 02 दिवसात देशातील हिमाचल प्रदेश , उत्तराखंडच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , बांगलादेश व आसाम राज्याच्या भागात चक्रीवादळाचे संकट येणार आहेत . याचा परिणाम आसाम , मेघालय , अरुणाचल प्रदेश , मेघालय या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
उत्तर प्रदेश व उत्तराखंड भागामध्ये देखिल पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . याशिवाय बिहार राज्याच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . देशात चक्रिवादळाची स्थिती दुसऱ्यांदा निर्माण झाल्याने , हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहेत .
तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता , पुढील काही दिवस तापमानात वाढ कायम राहणार असून , गारठा देखिल कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !