@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee February month payment update ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2025 चे वेतन देयके अदा करणेबाबत मोठी महत्वपुर्ण अपडेट संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
माहे फेब्रुवारी 2025 चे वेतन देयके सातवा वेतन आयोग 05 वा हप्ता ( उर्वरित 1 , 2 , 3 , 4 ) हप्त्यासह ऑनलाईन पारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यानुसार सातवा वेतन आयोगाचा 05 वा हप्ता अदा करण्यात आलेला आहे . तथापि उर्वरित लेखाशिर्षाबाबत स्वतंत्र आदेश / सुचना निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती .
तर सदर शासन परिपत्रकानुसार , लेखाशिर्ष 22021901 , 22021948 व 2202 एच 973 मध्ये मयत , सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला , दुसरा , तिसरा , चौथा हप्ता राहीला असल्यास , व पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी 2025 च्या वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
जर भविष्यात सातवा वेतन आयोग ( 7 TH PAY COMMISSION ) पहिला , दुसरा , तिसरा , चौथा व पाचवा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास , संबंधित शिक्षणाधिकारी व अधिक्षक , वेतन पथक ( माध्यमिक ) यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच दिलेल्या अनुदान प्रचलित नियमानुसार , करण्यात आलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !