नोकरदार वर्गांसाठी अर्थसंकल्पातुन काय मिळाले ? जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ What did the budget provide for the working classes? ] : नोकरदार वर्गांसाठी अर्थसंकल्पातुन नेमके काय मिळाले , ज्यामुळे नोकरदार वर्गांना फायदा होईल कि नुकसान ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

दिनांक 01 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्र सरकारचे अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केले , ते सलग आठव्यांदा केंद्राचे अर्थसंकल्प सादर केले आहे .या अर्थसंकल्पातुन मध्यमवर्ग व नोकरदार वर्ग यांना मोठा दिलासा मिळाला आहे . कारण नविन कर प्रणालीमध्ये मध्यमवर्ग व नोकरदारांसाठी 12 लाख रुपये पर्यंतचे वार्षिक उत्पन्न हे करमुक्त करण्यात आले आहेत .

नोकरदार वर्ग करीता स्टँडर्ट डिडक्शन 75,000/- हजर रुपये ठेवण्यात आले आहे , त्यामुळे 12,75,000/- रुपये पर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त करण्यात आल आहेत . एकंदरित ज्या नोकरदारांचे वार्षिक उत्पन्न हे 12,75,000/- रुपये इतके आहे , अशांना कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही .

नविन कर प्रणाली आयकर प्रणाली मध्ये 4 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्नावर शुन्य टक्के आयकर , तर 24 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30 टक्के आयकर द्यावा लागणार आहे . सन 2025-26 ची नविन कर प्रणाली पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रउत्पन्नआयकर
01.4 लाख रुपये0%
02.4-8 लाख रुपये5%
03.8-12 लाख रुपये10%
04.12-16 लाख रुपये15%
05.16-20 लाख रुपये20%
06.20-24 लाख रुपये25%
07.24 लाख रुपये पेक्षा जास्त30%

यांमध्ये सामान्य उत्पन्न हे 12 लाख रुपये पर्यंत असल्यास कोणताही कर भरावा लागणार नाही , तर 12 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्नावर 80 हजार रुपये पर्यंतचा कर फायदा होणार आहे .

Leave a Comment