@mrathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ nivadshreni vetanstar shasan nirnay ] : निवडश्रेणी वेतनस्तर लागु करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन आदेशानुसार नमुद करण्यात आले आहे कि , उप सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांना एस – 27 हा निवडश्रेणी वेतनस्तर लागु करण्याचे आदेश वित्त विभागाच्या दि.13.02.2023 व सामान्य प्रशासन विभागाच्या दि.28.03.2023 रोजीच्या संदर्भाधिन निर्णयानुसार आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन आदेशानुसार नमुद मंत्रालयीन विभागातील अधिकाऱ्यांना वेतनस्तर एस – 25 रुपये 78800-209200/- आदेशांमध्ये नमुद दिनांकास वेतनस्तर एस 27 रुपये 123,100-215,900/- हा निवडश्रेणी वेतनस्तर लागु करण्यात येत आहे .
सदर अधिकाऱ्यांची यादी प्रवर्ग व कार्यरत विभाग व एस – 27 निवडश्रेणी वेतनस्तर लागु करण्यात आलेला दिनांक यांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे . सदर अधिकाऱ्यांची वेतननिश्चिती ही महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 नुसार करण्यात आली आहे .
सदर निवडश्रेणी ही मा.सवोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुज्ञा याचिका कक्ष अधिकारी संवर्गाच्या ज्येष्ठतेबाबत मा.उच्च न्यायालयोन पारित केलेल्या दिनांक 06.08.2018 रोजीच्या आदेशाबाबत मा.सर्वोच्च न्यायालय याचिका व त्यातील आय.ए.क्र.2590/2019 मध्ये होणाऱ्या निर्णयाच्या अधिन राहून देण्यात येत आहे .

- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025