@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee retirement age demand update ] : राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याची शासन व प्रशासन स्तरावर वारंवार पाठपुरावा केला जात आहे . नुकतेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून याबाबत पुन्हा एकदा शासन व प्रशासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला आहे .
यापुर्वी तत्कालिन राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत , सकारात्मकता दर्शविली होती , परंतु याबाबत अद्याप कोणताही अधिकृत्त निर्णय न झाल्याने , कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी दिसून येत आहे .
सध्य स्थितीत राज्य शासन अंतर्गत वर्ग – 4 कर्मचारी व आखिल भारतीय सेवा अंतर्गत कार्यरत अधिकारी यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहेत , तसेच देशातील तब्बल 25 घटक राज्यात देखिल कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे इतके आहेत .
याशिवाय राज्य शासन सेवेत नियुक्तीसाठी खुला प्रवर्ग करीता 38 वर्षाची तर मागास प्रवर्ग करीता कला वयोमर्यादा 43 वर्षे इतकी आहे , असे असताना निवृत्तीचे वय हे 58 वर्षे असणे हे अत्यंत चुकीची बाब असून , कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीचा लाभ मिळत नाही .
याशिवाय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशातील लोकांचे सरासरी आयुर्मान 8-10 वर्षांनी वाढले असून , परिणामी कार्यक्षमतेत देखिल वाढ झालेली आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविणेबाबत , राज्याचे वरिष्ठ सचिव यांच्याकडे सदर विषयावर सविस्तर चर्चा झाली असता , सदर मागणी सचिवांकडून मंत्रीमंडळ निर्णयासाठी शिफारस करण्यात आली आहे .
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !