@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ women employee nirnay about balsangopan leave ] : महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत UGC ने महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेतला आहे . या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांना तब्बल 02 वर्षापर्यंत बालसंगोपणाची रजा अनुज्ञेय करण्यात येणार आहेत .
विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसी मार्फत महिला प्राध्यापिकांकरिता दोन वर्षांच्या बालसंगोपन रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . या निर्णयामुळे महिला प्राध्यापिकांना दीर्घरजेचा लाभ मिळणार आहे . तसेच सदरची रजा शैक्षणिक संस्थाकडून नाकारता येणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे .
विद्यापीठ अनुदान आयोग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , महिला प्राध्यापिकांना बालसंगोपन रजा दिले जात नसल्याच्या तक्रारी येत होत्या . यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) या संदर्भात कठोर कायदे करून सन 2025 पासून सदर नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे .
ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत असणाऱ्या महिलांना बालसंगोपन करिता दोन वर्षापर्यंत रजा देण्याची निर्देश दिले असून , सदर रजा नाकारल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेवर कठोर कारवाई केले जाईल , असे स्पष्टपणे सदर नियमांमध्ये नमूद करण्यात आली आहे .
राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 90 दिवसांची बालसंगोपन रजा अनुज्ञेय आहे . तर आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) यामध्ये भर टाकली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !