वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवाल राज्य शासनांकडे मंजूरीस सादर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ vetantruiti nivaran samiti ahaval ] : वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवाल राज्‍य शासनांकडे मंजूरीस सादर करण्यात आलेला आहे , सदर मंजूरीनंतर सातवा वेतन आयोगातील त्रुटी असणाऱ्या पदांना 01.01.2016 पासुन सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येणार आहेत .

वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार , राज्य शासनांकडून गठीत करण्यात आलेली वेतनत्रुटी निवारण समितीने आपला अहवाल राज्य शासनांकडे केला असून , सदर समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्‍या सेवा पुन्हा मुळ पदावर वर्ग करण्यात आले आहेत .

सदर अहवालास राज्य शासनांकडून , लवकरच मंजूरी दिली जाणार असून , याबाबत येत्या राज्य अर्थसंल्पामध्ये विशेष तरतुद केली जाईल . तर सदर अहवाल लागु केल्यानंतर वेतनत्रुटीचा लाभ हा दिनांक 01.01.2016 म्हणजेच सातवा वेतन आयोग लागु झाल्यापासून पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात येईल .

मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार , ज्या पदांच्या सातवा वेतन आयोगांमध्ये ( 7th Pay Commssion ) त्रुटी आढळून आलेल्या आहेत . अशा पदांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्याचे राज्य शासनांस सुचित केल्यानंतर राज्य शासनांकडून सदर समिती गठीत करुन , सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याचा सदर समितीचा मुख्य उद्देश होता .

Leave a Comment