पोस्टल मतदान करत असताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात “या” संदर्भात महत्वपूर्ण अपडेट ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ postal voting information] : पोस्टल मतदान करत असताना , काही चुका झाल्यास , सदर पोस्टल मतदान रद्द केले जाते . यामुळे कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदान करत असताना काही चुका कशाप्रकारे टाळाव्यात , या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेवूया ..

कर्मचाऱ्यांना संबंधित मतदान सुविधा केंद्रावर पोस्टल बॅलेट करिता पॉकेट दिली जाते , त्यामध्ये छोटे पॉकेट असते , सदर पॉकेट मध्ये आणखीन दोन लहान पॉकेट व घोषणापत्र असते . सदर पाकीट मध्ये मतपत्रिका असते .

सदर मतपत्रिकेवर उमेदवारांची यादी नमूद असते , त्यामध्ये आपल्याला ज्या उमेदवारांना मत द्यायचे आहे त्या उमेदवारा समोर ✓   असे चिन्ह तर नापसंत उमेदवारासमोर  X असे चिन्हांची खूण करावी . सदर खूण करत असताना , वरील उमेदवार व खालच्या उमेदवारांच्या चौकटीच्या बाहेर सदर चिन्हांकित खूण येणार नाही याची दक्षता घ्यावी .

सदर चिन्हांकित खून झाल्यानंतर सदर मतपत्रिका परत सदर पॉकेटमध्ये बंद करून डिंकाने चिटकून घ्यावे . त्यानंतर घोषणा पत्रकावर सही करून , सदर पॉकेटमध्ये बंद करून सदर मत पत्रिका मतदान पेटीत टाकावे .

खालील बाबतीत पोस्टल मत मोजले जात नाहीत.
01.घोषणा पत्रावर मत पत्रिका क्रमांक नसणे
02.attestation अधिकारी सही नसणे
03. खूण चुकीच्या पद्धतीने  केल्याने मतदान नेमके कोणत्या उमेदवाराला दिले हे समजणे कठीण होणे .
04. पाकिटावर सही नसणे हि रद्द ची कारणे आहेत .

Leave a Comment