लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आले हे 02 महत्त्वपूर्ण बदल ; या महिलांना यापुढे पैसे मिळणार नाही !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ladaki bahin Yojana new update] : लाडकी बहीण योजने अंतर्गत 02 मोठे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेली आहेत . या सुधारित बदलानुसार काही महिलांना , पैसे यापुढे मिळणार नाहीत . यामध्ये करण्यात आलेले 02 महत्त्वपूर्ण बदल पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..

महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार , अर्जदार लॉगिन केल्यानंतर , पात्र महिलांना अद्याप पर्यंत किती रक्कम प्राप्त झाले आहेत  , याचा तपशील दिसणार आहे . हे अगोदर सदर संकेतस्थळावर अपडेट मिळत नव्हती , परंतु आता सुधारित अपडेट नुसार अद्याप पर्यंत मिळालेले सर्व हप्ते यामध्ये दिसणार आहेत .

दुसरा मोठा महत्वपूर्ण बदल म्हणजे , ज्या महिलांना इतर सरकारी योजने मधून लाभ मिळत आहे . जसे की संजय गांधी पेन्शन योजना , श्रावण बाळ पेन्शन योजना किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळत आहेत .अशा महिलांना आता यापुढे सदर लाडकी बहीण योजने अंतर्गत पैसे मिळणार नाहीत .

यामध्ये अर्जदार लॉग इन केल्यानंतर , अर्जदाराच्या समोर संजय गांधी योजने अंतर्गत लाभ घेत असणाऱ्या महिलांच्या नावासमोर Yes असा ऑप्शन दिसेल सदर महिलांना यापुढे सदर योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही . तर ज्या महिलांच्या नावासमोर No असा स्टेटस दिसेल त्यांना यापुढे नियमित पैसे मिळत जातील .

म्हणजेच सदर नवीन अपडेट नुसार ज्या महिला यापूर्वीच इतर सरकारी योजनेतून लाभ घेत आहेत , अशा महिलांना यापुढे सदर लाडकी बहीण  योजने अंतर्गत लाभ मिळणार नाही .

Leave a Comment