@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee postal ballet voting update ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पोस्टल बॅलेट वोटिंग बाबत , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जाहीर आव्हान करण्यात आलेली आहे .
विधानसभा निवडणुका कामकाज करिता नियुक्त असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी बांधवांनी पोस्टल बॅलेट करिता अर्ज सादर केलेले आहेत, अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पोस्टल बॅलेट प्राप्त होणार आहेत .
यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना असे आव्हान करण्यात आले आहे की , आपल्या भविष्याचा विचार करून म्हणजेच जुनी पेन्शन मिळवण्यासाठी Vote For OPS अभियानात सहभाग नोंदवावा..
सदर पोस्टल बॅलेट मध्ये आपले मत अवैध होऊ नयेत , याची आवश्यक ती काळजी घेण्याची निर्देश देण्यात आलेले आहेत . कारण आपले एक मत आपले भविष्य सुरक्षित करू शकते , अशा प्रकारे राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात आलेली आहेत .
जर आपणास पोस्टल बॅलेट प्राप्त न झाल्यास आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावेत जेणेकरून लवकरात , लवकर पोस्टल बॅलेट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल .