@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ new maharashtra cm update ] : राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे अधिकच जोरात वाहत आहेत , अशामध्ये महायुती सरकारची स्थापना झाल्यास, मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असेल ? या उलट महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री पदाकरिता कोण दावेदार राहील , याबाबत राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने खालील प्रमाणे अपडेट देण्यात येत आहे .
राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यास , यामध्ये पक्षांच्या संख्याबळानुसार मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरणार आहे . अशी स्पष्ट भूमिका महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे , यामध्ये जर काँग्रेसचे संख्याबळ अधिक राहिल्यास , काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राहतील . तर शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षाचे संख्या बळ अधिक राहिल्यास , मुख्यमंत्री पदाचे दावेदार उद्धव ठाकरे हे राहतील .
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संख्याबळ अधिक राहिल्यास यामध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार रोहित पवार होण्याची मोठे संकेत सध्या दिसून येत आहेत .
तर महायुती पक्षाची स्थापना झाल्यास , यामध्ये यंदा भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा वाटप करण्यात आले असून भाजपाचे संख्या बळ इतर पक्षापेक्षा अधिक राहील , यामुळे महायुतीची पक्षाची सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस हे राहतील .
तर महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार व एकनाथ शिंदे यांची वर्णी लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे ..
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !