@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sudharit ashvasit pragati yojana paripatrak ] : राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणेबाबत , शिक्षण उपसंचालक नाशिक , नाशिक यांच्या मार्फत दि.27.08.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय दि.14.03.2024 नुसार राज्यामधील मान्यता प्राप्त असणाऱ्या प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन लागु करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
यांमध्ये पदांनुसार सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे लाभ पुढीलप्रमाणे पाहता येईल .
पदनाम | मुळ पदाची वेतनश्रीणी | पहिला लाभ 12 वर्षे नंतर | दुसरा लाभ 24 वर्षे नंतर |
शिपाई | एस – 1 | एस – 3 | एस -4 |
नाईक | एस – 3 | एस – 4 | एस – 5 |
कनिष्ठ लिपिक | एस – 6 | एस – 8 | एस – 13 |
वरिष्ठ लिपिक | एस – 8 | एस – 13 | एस – 14 |
प्रयोगशाळा परिचर | एस – 6 | एस – 7 | एस – 8 |
प्रयोगशाळा सहाय्यक | एस – 7 | एस – 8 | एस – 9 |
पुर्णवेळ ग्रंथपाल (अपदवीधर) | एस – 8 | एस – 9 | एस – 10 |
पुर्णवेळ ग्रंथपाल ( पदवीधर ) | एस – 10 | एस – 11 | एस – 12 |
सदरचे परिपत्रक हे शासन निर्णय दि.14.03.2024 रोजीच्या परिपत्रकानुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक , जळगाव , धुळे , नंदुरबार तसेच लेखाधिकारी शिक्षण विभाग , नाशिक , जळगांव , धुळे , नंदुरबार यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे .
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !