नोकरीपेक्षा ग्रामीण भागामध्ये , कमी पैशात करा फायदेशीर व्यवसाय !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ rural area business for high profit ] : आज-काल सुशिक्षित बेरोजगार तरुण मुंबई , पुण्यासारख्या ठिकाणी कमी पगारामध्ये नोकरी करणे पसंत करतात ,  परंतु आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत . छोट्या व्यवसायामधून नोकरीपेक्षा अधिक पैसा मिळतो , अशा व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेऊया ..

दुग्ध व्यवसाय : आज-काल सुशिक्षित तरुण ग्रामीण भागामध्ये राहून दुग्ध व्यवसाय सरकारी योजनेच्या सहाय्याने यशस्वी करीत आहेत . ज्यातून त्यांना नोकरीपेक्षा पाचपट पैसा मिळत आहे . दुग्ध व्यवसाय करण्याकरिता राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून गाई म्हशी वाटप केले जाते . ज्यातून सुशिक्षित तरुणांना व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहन दिले जाते . अशा प्रकारचा व्यवसाय ग्रामीण भागामध्येच , राहून यशस्वी नियोजन करून नोकरीपेक्षा अधिक पैसा कमवू शकता ..

वराह पालन : वराह पालन हे मांस विक्रीकरिता केला जाते , ज्याची मागणी चांगल्या प्रकारे आहे , सदर व्यवसाय करण्याकरिता देखील राज्य सरकारकडून अनुदान उपलब्ध करून दिली जाते , सदर अनुदानाच्या माध्यमातून वराह पालन यशस्वी करू शकता .

कुक्कुटपालन : कुक्कुटपालन हा व्यवसाय काही प्रमाणात जोखमीचा आहे , परंतु योग्य प्रकारे नियोजन करून सदर कुक्कुटपालन हा व्यवसाय उत्तमरीत्या यशस्वी करू शकता , ज्या करिता राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते .

पॉलिहाऊस : पॉलिहाऊसच्या माध्यमातून पालेभाज्या , फळभाज्या , मसाल्याचे पदार्थ यांचे उत्पादन यशस्वीरित्या घेवू शकता . कारण सदर पॉलिहाऊसमध्ये तापमान तसेच हवामान पिकानुसार नियंत्रित करता येते , ज्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते .

व्यापारी विचारातून कमाई : व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून कच्चामाल घेऊन थेट उत्पादक कंपन्या किंवा ज्या ठिकाणी मागणी आहे , अशा ठिकाणी पुरवठा करून चांगल्या प्रकारे पैसा कमवता जसे की शेतकऱ्यांकडून आंबे घेऊन आंब्यापासून ज्यूस बनवणाऱ्या कंपनीस थेट पुरवठा करून अधिक नफा कमवता . त्याप्रकारे ग्रामीण पातळीवर राहून शेतकऱ्यांनी थेट पुरवठा कंपनी किंवा ज्या ठिकाणी मागणी जास्त आहे , त्या ठिकाणी पुरवठा केल्यास अधिक नफा कमवला जाऊ शकतो , हा एक प्रकारचा व्यवसायच आहे .

Leave a Comment