@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ rural area business for high profit ] : आज-काल सुशिक्षित बेरोजगार तरुण मुंबई , पुण्यासारख्या ठिकाणी कमी पगारामध्ये नोकरी करणे पसंत करतात , परंतु आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत . छोट्या व्यवसायामधून नोकरीपेक्षा अधिक पैसा मिळतो , अशा व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेऊया ..
दुग्ध व्यवसाय : आज-काल सुशिक्षित तरुण ग्रामीण भागामध्ये राहून दुग्ध व्यवसाय सरकारी योजनेच्या सहाय्याने यशस्वी करीत आहेत . ज्यातून त्यांना नोकरीपेक्षा पाचपट पैसा मिळत आहे . दुग्ध व्यवसाय करण्याकरिता राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून गाई म्हशी वाटप केले जाते . ज्यातून सुशिक्षित तरुणांना व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहन दिले जाते . अशा प्रकारचा व्यवसाय ग्रामीण भागामध्येच , राहून यशस्वी नियोजन करून नोकरीपेक्षा अधिक पैसा कमवू शकता ..
वराह पालन : वराह पालन हे मांस विक्रीकरिता केला जाते , ज्याची मागणी चांगल्या प्रकारे आहे , सदर व्यवसाय करण्याकरिता देखील राज्य सरकारकडून अनुदान उपलब्ध करून दिली जाते , सदर अनुदानाच्या माध्यमातून वराह पालन यशस्वी करू शकता .
कुक्कुटपालन : कुक्कुटपालन हा व्यवसाय काही प्रमाणात जोखमीचा आहे , परंतु योग्य प्रकारे नियोजन करून सदर कुक्कुटपालन हा व्यवसाय उत्तमरीत्या यशस्वी करू शकता , ज्या करिता राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते .
पॉलिहाऊस : पॉलिहाऊसच्या माध्यमातून पालेभाज्या , फळभाज्या , मसाल्याचे पदार्थ यांचे उत्पादन यशस्वीरित्या घेवू शकता . कारण सदर पॉलिहाऊसमध्ये तापमान तसेच हवामान पिकानुसार नियंत्रित करता येते , ज्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते .
व्यापारी विचारातून कमाई : व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून कच्चामाल घेऊन थेट उत्पादक कंपन्या किंवा ज्या ठिकाणी मागणी आहे , अशा ठिकाणी पुरवठा करून चांगल्या प्रकारे पैसा कमवता जसे की शेतकऱ्यांकडून आंबे घेऊन आंब्यापासून ज्यूस बनवणाऱ्या कंपनीस थेट पुरवठा करून अधिक नफा कमवता . त्याप्रकारे ग्रामीण पातळीवर राहून शेतकऱ्यांनी थेट पुरवठा कंपनी किंवा ज्या ठिकाणी मागणी जास्त आहे , त्या ठिकाणी पुरवठा केल्यास अधिक नफा कमवला जाऊ शकतो , हा एक प्रकारचा व्यवसायच आहे .
- पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
- Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !