सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या महागाई भत्यात 2% ची वाढ ; वेतनात होणार मोठी वाढ !

Spread the love

@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 2% increase in dearness allowance for government employees/pensioners; There will be a big increase in salaries.. ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 2 टक्के वाढ करणेबाबत , केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे . यामुळे आता केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांच्या पगारात वाढ होणार आहे .

02 टक्के वाढ : केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये दिनांक 01.01.2025 पासुन 02 टक्के वाढ करण्यात आलेली आहे . सदर डी.ए वाढीच्या निर्णयाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाची दिनांक 28 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे .

एकुण महागाई भत्ता 55 टक्के : केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांचा एकुण महागाई भत्ता हा 53 टक्के वरुन 55 टक्के इतका झाला आहे . तर माहे जानेवारी 2025 पासुनचा डी.ए फरक देखिल अदा करण्यात येणार आहे .

एप्रिल महिन्याच्या पगारासोबत वाढीव डी.ए : केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहे एप्रिल महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत सदर वाढीव डी.ए  अदा करण्यात येणार आहे .

यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान 360/- रुपयांची वाढ होणार आहे . सदर डी.ए वाढीचा निर्णय पेन्शन धारकांना देखिल होणार असल्याने , पेन्शन मध्ये देखिल वाढ होणार आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment