@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 04 important cabinet decisions were taken in the cabinet meeting held on June 3rd. ] : काल दिनांक 03 जुन 2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 04 महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय राज्याचे मा.मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले आहेत .
01.अनुसुचित जाती आयोगास स्वतंत्र कार्यभार : राज्यात अनुसुचित आयोगाच्या स्थापनेस व सदर आयोगाचा स्वतंत्र कार्यभार राहणार असल्याचे कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत . सदर आयोग करीता पदनिर्मिती , जागा तसेच त्या अनुषंगिक खर्च करीता मंजुरी देण्यात आली आहे .
यांमध्ये 26 नव्याने पदे निर्माण करण्यात येणार असून , याकरीता लागणारा खर्च रुपये 4 कोटी 20 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत . यांमध्ये कर्मचारी वेतन / भत्ते , तसेच कार्यालयीन भाडे , जागा , वीज , दुरध्वनी , इंधन , आदी बाबीवरील खर्चाचा समावेश असणार आहे .
02.रुग्णालयासाठी 15 एकर जमीन : छ.संभाजीनगर मधील कामगार विमा महामंडळ करीता 200 खाटांच्या रुग्णालय करीता करोडी मधील 15 एकर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे . याशिवाय अहिल्यानगर , सांगली , अमरावती , बिबवेवाडी ( पुणे ) बल्लारपुर ( चंद्रपुर ) , बारामती ( पुणे ) , सिन्नर ( नाशिक ) , पनवेल ( रायगड ) , सातारा या ठिकाणी देखिल प्रस्तावित रुग्णालयाकरीता सरकारी जमीनी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे .
03.मातृदुग्ध शाळेची जमीन हस्तांतरणाच्या करारनाम्यातील अटी / शर्तीमध्ये सुधारणा : धारावी ( मुंबई ) पुनर्विकास प्रकल्प दुग्ध व्यवसाय विकास विभाग कुर्ला येथील 8.5 हेक्टर इतकी जमीन हस्तांतरण करण्याच्या करारनान्यातील अटी / शर्ती मध्ये सुधारणा करण्यात आले आहेत .
04.पथकराच्या सवलतीपोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास भरपाई : मुंबई शहर प्रवेश करीता 05 पथकर नाक्यांवर हलकी वाहने , शालेय बसेस तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांना पथकरामध्ये सवलत देण्यात आलेली आहे . यामुळे सदर पथकर सवलतीमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास 775 कोटी 58 लाख रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !