कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ What benefits will employees/pensioners get in the new pay commissions ? ] : कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन ( आठवा ) वेतन आयोगांमध्ये कोण-काणते फायदे मिळणार ? या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेवूयात .

सुधारित वेतनश्रेणी : आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु केले , जाईल . ज्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे . सातवा वेतन आयोगातील पे – स्केल , पे मॅट्रिक्स मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे .

इतर देय भत्ते मध्ये वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्ते मध्ये वाढ होईल , तर यापैकी महागाई भत्ताचे दर हे पुन्हा एकदा शुन्य टक्के होईल . तर घरभाडे भत्ता , वाहन भत्ता , प्रोत्साहन भत्ता अशा भत्यांमध्ये मोठी वाढ होईल .

पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये वाढ : नुकतेच केंद्र सरकारने नविन वित्तीय कायदा 2025 मंजूर करण्यात आलेला आहे , यानुसार पेन्शन धारकांना महागाई भत्ता व नविन वेतन आयोग लागु करण्यासाठी सरकारकडून नव्याने स्वतंत्ररित्या निर्णय घेवून निर्णय घेण्यात येईल , अशी तरतुद करण्यात आलेली आहे . यामुळे नविन वेतन आयोगासाठी पेन्शन धारकांना स्वतंत्र निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे .

हे पण वाचा : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण / लाभदायक शासन निर्णय निर्गमित GR दि.27.05.2025

आठवा वेतन आयोगाची सद्यस्थिती : आठवा वेतन आयोग हा दिनांक 01.01.2026 पासुन लागु होणे , अपेक्षित आहे . परंतु सध्याची वेतन आयोगा बाबत केंद्रीय पातळीवर सुरु असणाऱ्या हालचालींचा विचार करता .. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगासाठी किमान 08 महिने विलंब होवू शकतो . म्हणजेच आठवा वेतन आयोग ऑगस्ट / सप्टेंबर 2026 पर्यंत प्रत्यक्ष लागु होवू शकतो .

कारण आठवा वेतन आयोग समितीची स्थापना अद्याप करण्यात आलेली नाही , तर सदर समितीकरीता आवश्यक अधिकाऱ्यांसाठी प्रतिनियुक्तीने काम करण्यासाठी संमती मागविण्यात आलेली आहे .

Leave a Comment