@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important GRs issued regarding recommendations regarding the issues of working employees and payment of outstanding salaries ] : कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्नासंदर्भात शिफारशी व थकीत वेतन अदा करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.थकीत वेतन : अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत , निर्गमित शासन निर्णयानुसार , नमुद करण्यात आले आहेत कि , मा.न्यायालय मुंबई , औरंगाबाद येथे दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिका नुसार 105 विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते सेवासमाप्ती पर्यंतच्या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यासाठी ..
21,59,03,900/- ( अक्षरी – एकवीस कोटी एकोणसाठी लाख तीन हजार नऊशे रुपये फक्त ) इतका निधी वितरीत करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .तसेच सदर थकीत वेतनाच्या रकमेची अनुज्ञेयता व परिगणना शिक्षक संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहुन निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे .
02.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समितीचे गठण : समग्र शिक्षा योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न बाबत शासनांस शिफारशी करण्याकरीता समितीचे पुनर्रचना करण्यात आली आहे . यांमध्ये अपर मुख्य सचिव ( सेवा ) सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे .
सदर समितीने करार कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत समायोजन तसेच अन्य प्रश्न बाबत , अन्य राज्यांमध्ये सदर योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांची नियुक्ती , मानधन तसेच अन्य सेवाशर्ती या बाबत अभ्यास करुन शासनांस 03 महिन्याच्या आतमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !