@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important Government Decisions (GR) were issued regarding State Officers/Employees on 02.05.2025. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.शासकीय कर्मचारी इ. कर्ज / घरबांधणी अग्रीम वाटप : वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना कर्ज / घरबांधणी अग्रीम वाटप करणेबाबत अटी / शर्ती नमुद करण्यात आलेले आहेत .
सदरच्या अटी / शर्तीमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सदर अग्रीम / कर्जाची रक्कम ही सदर कर्मचारी हा निवृत्त होण्यापुर्वी त्याच्याकडून वसुली होईल , अशा पद्धतीने मंजूर करण्यात यावेत ,असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वित्तीय वर्षाचे नुदान उपलब्ध असेपर्यंत सदर अग्रिमास मंजूरी देवून अग्रिमाची रक्कम कोषागारातुन काढण्याचे निर्देश दिले आहेत . तसेच कोषागारातून रक्कम काढल्याच्या नंतर सदरची रक्कम ही तीन दिवसाच्या आत संबंधित अर्जदाराला देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
02.अधिकारी / कर्मचाऱ्यांची बदली : सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 02.05.2025 रोजीच्या शासन आदेशानुसार , सहायक कक्ष अधिकारी व लिपिक – टंकलेखक यांची बदली करण्यात आलेली आहे . यांमध्ये 04 सहायक कक्ष अधिकारी तर 03 लिपिक – टंकलेखक यांच्या बदली करण्यात आलेल्या आहेत .
सदर शासन आदेशानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , सदर आदेशातील अधिकाऱ्यांना / कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागात रुजु होण्यासाठी दिनांक 05.05.2025 पासुन एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे , त्यानुसार सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागात रुजु व्हावेत असे नमुद करण्यात आलेले आहेत.
या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click here
- NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !
- राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !
- केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही दि.01.07.2025 पासुन 3% महागाई भत्ता वाढ मिळणेबाबत ….
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !