राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी , नविन वर्षात शाळा सुरु करणेबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर ; परिपत्रक दि.29.04.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Revised schedule announced for summer vacations in the state, starting of schools in the new year ] : राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी व नविन वर्षांमध्ये शाळा सुरु करणेबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 29.04.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत  कि , राज्यातील राज्य मंडळ यांमध्ये प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या वेळापत्रकांमध्ये एकसुत्रता यावी याकरीता सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रकानुसार उन्हाळी सुट्टी ही दिनांक 02.05.2025 रोजी वार शुक्रवार रोजी जाहीर करण्यात आलेली आहे . म्हणजेच दिनांक 01 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर , 02 मे पासुन विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे .

तर आगामी नविन शैक्षणिक वर्ष ( सन 2025-26 ) मध्ये विदर्भ वगळता सर्व शाळा ह्या दिनांक 16 जुन पासुन सुरु करण्यास तर विदर्भातील तापमानाचा विचार करता दिनांक 23 जुन पासुन तापमानाचा विचार करुन शाळा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

यांमध्ये दिनांक 23 जुन ते 28 जुन या काळात विदर्भातील शाळा ह्या सकाळ सत्रांमध्ये ( सकाळी 7.00 ते 11.45 या वेळेत ) तर दिनांक 30.06.2025 पासुन नियमित शाळा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment