राज्यातील “या” कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ ; शासन निर्णय निर्गमित दि.30.04.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Increase in the salaries of these employees in the state; Government decision issued on 30.04.2025 ] : कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये वाढ करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कडून दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार राज्यांमधील मान्यताप्राप्त असणाऱ्या माध्यमिक शाळा त्याचबरोबर उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयाकरिता अर्धवेळ शिक्षक आवश्यक असणारा कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल , अशा विषयाकरिता अध्यापन करण्यासाठी ..

शैक्षणिक पात्रता व्यक्तीचे तासीका तत्वावर नियुक्ती करण्यात येवून सदर कर्मचाऱ्यास  तासिकेनुसार मानधन देण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार बाब नमूद करण्यात आलेली आहे . सदर शिक्षकांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .

सदर शासन निर्णयानुसार राज्यातील मान्यताप्राप्त असणाऱ्या खाजगी अनुदानित माध्यमिक त्याचबरोबर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय मध्ये घडाळी तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या मानधनांमध्ये (payment ) वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे . सुधारित मानधन पुढील प्रमाणे पाहू शकता ..

विद्यालय स्तरयापुर्वी देण्यात येणारे प्रतितास मानधनसुधारित प्रतितास मानधन
कनिष्ठ / उच्च माध्यमिक महाविद्यालय150/- रुपये300/- रुपये
माध्यमिक120/- रुपये250/- रुपये

तसेच सदर शासन निर्णयांमध्ये नमुद केल्यानुसार , अर्हता पुर्ण नसणाऱ्या शिक्षकांची घड्याळी तासिक तत्वावर नियुक्ती न देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment