@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Will the retirement age of state employees increase? Know the important update now ] : राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वयात वाढ होणार का ? असा सवाल प्रत्येक कर्मचाऱ्यांस पडला आहे , या संदर्भात राज्य सरकारकडून सकारात्मक आहे कि नाही ? या बाबतची सविस्तर अपडेट खालील प्रमाणे जाणून घेवूयात ..
सध्याचे निवृत्तीचे वय : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट अ , ब व क संवर्गामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षे इतके आहे , तर गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे इतके आहे .
केंद्र व इतर राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय : केंद्र सरकारने निवृत्तीचे वय वाढवून 60 वर्षे इतके केले आहे , त्याच धर्तीवर देशातील 25 राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीच्या वयात वाढ करुन 60 वर्षे इतके करण्यात आले आहे .
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांची मागणी काय ? : केंद्र सरकार तसेच इतर 25 राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील गट अ , ब व क संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे वरुन 60 वर्षे करण्याची बऱ्याच दिवसांपासुन मागणी आहे .
हे पण वाचा : इंडियन ओव्हरसीज बँकेत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
राज्य सरकारची भुमिका : राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते , परंतु काही आमदार व संघटनांकडून विरोध दर्शविल्याने , सदर सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा प्रस्ताव अद्याव प्रलंबित राहीला आहे .
निवृत्तीचे वय वाढ करणेबाबत , कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी निवेदन सादर केले जाते . सध्या राज्य शासन सेवेत अनेक पदे रिक्त आहेत , सदर पदांवर पुढील 02 वर्षात पदभरती न केल्यास , सरकारकडून विद्यमान कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा विचार केला जावू शकतो .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- बदली संदर्भात ग्रामविकास विभाग मार्फत आत्ताचे नविन परिपत्रक निर्गमित दि.30.05.2025
- राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात दि.30 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण / लाभदायक शासन निर्णय निर्गमित GR दि.27.05.2025
- पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी धक्कादायक बातमी ; संसदेत नविन वित्तीय कायदा 2025 मंजुरीनुसार डी.ए व वेतन आयोगावर रोख !
- निवृत्त / स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी मंजूर ; जाणून घ्या सविस्तर निर्णय .