@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : लोकसभा निवडणुका 2024 साठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडर यांनी कोणत्या इतर पक्षासोबत युती न करता ऐकटेच लढण्याचा निर्णय घेतले . आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दोन यादी जाहीर करण्यात आलेल्या असून , लवकरच तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
वंचित बहुजन आघाडी पक्षाने उमेदवारी जाहीर करताना , जातीचा विचार न करता इतर पक्षातील उमेदवारांना देखिल यांमध्ये संधी देण्यात आली आहे . मात्र पहिल्या यादीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सहकार्यांना प्रथम संधी दिली आहे .पहिली व दुसरी यादीमध्ये उमेदवारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पहिली यादी मधील वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार :
- राजेश बेले – चंद्रपुर
- प्रकाश आंबेडकर – अकोला
- वसंतराव मगर – बुलडाणा
- प्राजक्ता पिल्लेवान – अमरावती
- प्रा.राजेंद्र साळूंके – वर्धा
- खेमसिंग पवार – यवतमाळ – वाशिम
- सांगली मतदारसंघ – येथे श्री.प्रकाश शेंडगे यांच्या OBC बहुजन पार्टीला पाठींबा देण्यात आलेला आहे .
- नागपूर मतदारसंघ – येथे काँग्रेस उमेदवार असणारे विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे .
वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या यादीमध्ये इतर जातीतील उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आलेली आहे , दुसरी यादीमध्ये एकुण 11 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
मतदारसंघ | उमेदवाराचे नाव | जात / धर्म |
लातुर | नरिसिंहराव उदगीरकर | मातंग |
हिंगोली | डॉ.बीडी चव्हाण | बंजारा |
सातारा | मारुती धोंडीराम जानकर | धनगर |
माढा | रमेश नागनाथ बारसकर | माळी |
सोलापुर | राहूल काशिनाथ गायकवाड | बौद्ध |
धुळे | अब्दुर रहमान | मुस्लीम |
मुंबई उत्तर मध्य | अबु हसन खान | मुस्लीम |
रत्नागिरी – सिंधुदुर्ग | काका जोशी | कुणबी |
जालना | प्रभाकर देवमन बकले | धनगर |
रावेर | संजय पंडीत ब्राम्हणे | बौद्ध |
हातकलंगणे | दादासाहेब दादागौडा चौगौडा पाटील | जैन |