@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ UPI PAYMENT WITHOUT INTERNET ] : UPI पेमेंट करण्यासाठी आता इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही , कारण भारतामध्ये यूपीआय पेमेंटचा वापर सर्वाधिक केला जात आहे . सदर यूपीआय पेमेंट ला चालना देण्याकरिता भारतामध्ये नवीन फीचर्स लॉन्च करण्यात आले आहे . या नवीन फिचर मध्ये आता ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी नेटची आवश्यकता भासणार नाही .
इंटरनेट शिवाय यूपीआय पेमेंट करण्याकरिता काही प्रमुख चार पद्धती अमलात आणल्या आहेत . यामध्ये पहिली पद्धत मध्ये ज्या वापरकर्त्याकडे स्मार्टफोन नाही , अशांना आय व्ही आर ( Interactive Voice Response ) व्हॉइस द्वारे पेमेंट करू शकता , याकरिता युजरना आय व्ही आर क्रमांकावर संपर्क करावा लागेल , त्यानंतर आपल्या कीपॅड मोबाईल क्रमांकामधून योग्य तो पर्याय निवडून यशस्वीरित्या पेमेंट करू शकता .
दुसरी पद्धत म्हणजे साऊंड बेस्ड पेमेंट पद्धत , ज्यामध्ये आपल्या जवळ असणाऱ्या डिवाइसच्या स्पेशल टोन द्वारे पेमेंट करू शकता . म्हणजेच आपला फोन टॅप करून पैसे हस्तांतर करू शकता , या पद्धतीला POD पद्धत असेही म्हटले जाते .
तिसरी महत्त्वपूर्ण पद्धत म्हणजे वापर करते मिस्ड कॉलच्या माध्यमातून पैसे पाठवू शकता , याकरिता यूजर करताना मिस्ड कॉल द्यावा लागेल , त्यानंतर परत त्या नंबरवर कॉल येईल , कॉल मध्ये यूपीआय ( UPI ) पिन टाकून ट्रांजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण करू शकता .
तर चौथा महत्त्वपूर्ण पर्याय म्हणजे वापरकर्त्यांना आपल्या फोन मधील यूपीआय ॲपच्या द्वारे पेमेंट करू शकता ..
- बजेटपुर्वीच करा या शेअरची खरेदी ; मिळेल सर्वाधिक परतावा !
- महिला कर्मचाऱ्यांसाठी UGC चा मोठा महत्त्वपूर्ण दिलासदायक निर्णय !
- केंद्रीय अर्थसंकल्पांमध्ये सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना मिळणार हे 03 मोठे लाभ ; जाणून घ्या सविस्तर !
- आठवा वेतन आयोगांमध्ये या 04 प्रमुख घटकावर होणार सुधारित वेतननिश्चिती ; जाणून घ्या सविस्तर !
- कार्यालयीन गतिमानता अभियान अंतर्गत अधिकारी / कर्मचाऱ्यांना करावे लागणार हे 11 कामे ! GR निर्गमित दि.20.01.2025