अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आल्या या 10 महत्वपुर्ण घोषणा ; जाणून घ्या सविसतर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These 10 important announcements for farmers were made in the budget. ] : दिनांक 01.02.2025 रोजी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पांमध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी 10 महत्वपुर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत . ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षतेचा फायदा मिळणार आहे .

किसान क्रेडिट कार्ड मर्यादा : केसीसी म्हणजेच किसान क्रेडीट कार्डची मर्यादा वाढविण्यात आली असून , आता ही मर्यादा 03 लाख रुपये वरुन 05 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे . याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे .

युरिया उत्पादन : युरिया हे देशातील प्रमुख खत आहे , जे निर्मिती करण्यासाठी भारत हा आत्मनिर्भरता आणण्यासाठी देशांमध्ये 03 नविन कारखाने सुरु करण्यात येणार आहेत , ज्यांची उत्पादन क्षमता ही 12.7 लाख मेट्रिक टन इतकी आहे .

  • बिहार राज्यांमध्ये मकाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा .
  • कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर करण्यास अधिक भर .
  • कापसाच्या विविध जातींचा विकास .
  • प्रधानमंत्री धन – धान्य कृषी योजना अंतर्गत 100 जिल्ह्यांवर विशेष लक्ष – 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा .
  • डाळीं करीता 06 वर्ष करीता आत्मनिर्भरता योजना .
  • फळ तसेच भाजीपाल उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष योजना .
  • समुद्रातुन मासेमारीकरीता अंदमान – निकोबार व लक्षद्वीप बेटांवर  शाश्वत संकलन केंद्र.
  • कापुस उत्पादकतेकरीता 05 वर्षांचे अभियान .

Leave a Comment