@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The revised pay scale in State Pay Revision Committee Volume – 2 is applicable to these posts. ] : राज्य वेतन सुधारणा समिती , 2017 च्या अहवाल खंड – 02 मधील सुधारित वेतनश्रेणी खाली नमुद पदांस मंजूर करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 03.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड – 02 मधील शिफारशी बाबत शासन निर्णय 13.02.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार ज्या संवर्गांना सुधारित वेतनस्तर मंजूर करण्यात आलेले आहेत . त्या संवर्गांची यादी उक्त शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेली आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस व गाईडस् मुंबई संस्थेच्या आस्थापनेवरील लघुलेखक संवर्गातील पदांना दिनांक 13.02.2023 रोजीच्या संदर्भाधिन निर्णयानुसार सुधारित करण्यात आलेल्या वेतनस्तन एस – 41800-132300/- लागु करण्यास सदर निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे .
तसेच सदर संवर्गातील पदांना सुधारित वेतनस्तर लागु करताना दिनांक 13.02.2023 रोजीच्या व दिनांक 22.02.2024 च्या शासन निर्णयातील आदेश तसेच अटी व शर्ती लागु राहतील , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
राज्य भारत स्काऊटस व गाईडस ,मुंबई संस्थेतील लघुलेखक या पदनामाऐवजी लघुलेखक असे पदनाम करण्यात येत आहेत . त्याप्रमाणे सदर संस्थेतील सर्व कार्यालयीन अभिलेखांमध्ये दुरुस्ती करावी असे नुद करण्यात आले आहेत . तसेच लघुलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सदर सुधारित वेतनस्तर त्यांच्या नियुक्ती / पदोन्नतीच्या दिनांकापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावेत , व प्रत्यक्ष लाभ हे दिनांक 01.02.2023 पासुन अनुज्ञेय राहतील असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तर दिनांक 01.01.2016 ते दिनांक 31.01.2023 या कालावधीतील कोणतीही थकबाकी संबंधितांना अनुज्ञेय राहणार नाही , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
- शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे फार्मर ॲप्स व इंटरफेस पोर्टल तयार करण्यास मंजूरी ; GR दि.31.01.2025
- राज्य वेतन सुधारणा समिती खंड – 2 मधील सुधारित वेतनश्रेणी या पदांस लागु ; शासन निर्णय निर्गमित दि.03.02.2025
- आता राज्यात सरकारी / निमसरकारी कार्यालयात मराठी भाषाचा वापर अनिवार्य ; अन्यथा होणार कारवाई , GR निर्गमित दि.03.02.2025
- काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ; पाहा सविस्तर !