शेअर मार्केट मध्ये कोरोना नंतर दुसऱ्या सर्वात मोठी घसरण ; गुंतवणुक करावे कि नाही – जाणून घ्या तज्ञांचे मत !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The biggest fall in the stock market so far; Should you invest or not – know the opinion of experts. ] : शेअर बाजारात आत्तापर्यंतची सर्वात मोठी घसरण काल दिनांक 07 एप्रिल रोजी दिसून आली , यामुळे आता शेअर बाजारात गुंतवणुक करावी कि नाही , असा प्रश्न गुंतवणूक दारांना पडत असेल . यावर तज्ञांचे नेमके काय मत आहे ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

काल दिनांक 07 एप्रिल 2025 रोजी SENSEX तब्बल 2226.78 अंकानी म्हणजेच 2.95 टक्केनी खाली घसरला . तर NIFTY 50 हा 742.85 अंकानी म्हणजेच 3.24 टक्के खाली घसरला यामुळे गुंतवणुक दारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत .

अमेरिकेत टॅरिफ लागु – अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागु केल्यानंतर अमेरिकेसह जगभरातील शेअर मार्केट कोसळला आहे . ही घसरण कोरोना नंतरची सर्वात मोठी घसरण आहे . भारतीय शेअर बाजारात काल दिनांक 07 एप्रिल रोजी सेन्सेक्स तब्बल 3000 अंकांनी खाली गेल्याने , काळा सोमवार म्हणून संबोधण्यात आले .

हे पण वाचा : राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक 7 एप्रिल 2025

शेअर बाजारात घसरण होण्याची दुसरे प्रमुख कारण : जागतिक पातळीवर विदेशी गुंतवणूक दार हे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेत असल्याने , शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे .

यापुढे गुंतवणूक करावी कि नाही : शेअर बाजारातील मोठी गुंतवणूक पाहून यापुढे गुंतवणूक करावी कि नाही ? असा प्रश्न गुंतवणूक दारांना पडत आहे . तर तज्ञांचे मते भविष्यात भारतीय शेअर बाजारात उच्चांकी येईल , यामुळे गुंतवणूक ही लाँग टर्म करीता करावी जेणेकरुन भविष्यात फायदा होईल , असा सल्ला दिला आहे .

Leave a Comment