राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना या नियमांचे पालन करावेच लागणार ; अन्यथा कार्यवाही होवू शकेल !

Spread the love

@marathiprasar वैशाली पवार प्रतिनिधी [ State officers/employees must comply with these rules; otherwise, action may be taken. ] : सध्या सोशल मिडीयाचा वापर सर्वाधिक होत आहे , यामुळे नागरिक देखिल प्रशासन बाबत अधिक जागरुक झाले आहेत . विशेष करुन प्रशासन कामकाजांमध्ये आपली भुमिका नेमकी काय ? याबाबत विचारणा करीत आहेत .

शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक कामाच्या निमित्ताने आले असता , त्यांना कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ओळख सहज पटावी , याकरीता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 10.10.2023 रोजीच्या निर्णयानुसार अधिकारी / कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दर्शनी भागात लावणेबाबत निर्देश दिले आहेत .

परंतु सदर नियमांचे पालन राज्य अधिकारी / कर्मचारी करत नसल्याचे तक्रारी वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाकडे दिले जातात . यावर वरिष्ठ कार्यालयाकडून देखिल वेळोवेळी परिपत्रक काढून अधिकारी / कर्मचाऱ्यांनी दर्शनी भागात ओळखपत्र लावणे बाबत , निर्देश दिले जाते .

हे पण वाचा : शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !

आता नागरिक अधिक जागरुक झाले असून , त्यांच्या तक्रारीने एखाद्या अधिकारी / कर्मचाऱ्यांने ओळखपत्र न लावल्यास त्यांच्या विरुद्ध कडक शिक्षा संबंधित कार्यालय प्रमुखांकडून दिली जावू शकेल .

यामुळे राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांनी यापुढे आपले ओळखपत्र दर्शनी भागावर लावावेत , ज्यांमध्ये आपले नाव , पदनाम स्पष्ट दिसेल .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment