@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ When will state employees get a 2% increase in dearness allowance on the lines of the central government? ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यामध्ये जानेवारी 2025 पासून 02 टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे , सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार ? या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट खालील प्रमाणे जाणून घेवुयात .
केंद्र सरकारने दिनांक 01 जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 02 टक्के वाढीव महागाई भत्ता , डीए फरकासह लागू करण्यात आला आहे . सदर वाढीव महागाई भत्ता (DA ) माहे एप्रिल महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे .
हे पण वाचा : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता (DA) लागू करण्यात येत असतो . केंद्र सरकारने जानेवारी महिन्यातील महागाई भत्ता (DA) वाढ लागू केल्यानंतर , महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सदर वाढीव महागाई भत्ता लागू करण्यास , दरवर्षी तीन ते चार महिन्यांचा विलंब होत असतो .
यानुसार केंद्र सरकारने लागू केलेला 2% वाढीव महागाई भत्ता हा राज्य कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागू केला जाईल . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील महागाई भत्ता वाढीसाठी अजून 3 ते 4 महिन्यांची वाट पहावी लागणार आहे .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय !
- कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.22.04.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.22 एप्रिल रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2025 चे वेतनासाठी करावे लागणार हे काम ; वित्त विभाग मार्फत GR निर्गमित !