राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्राप्रमाणे 58% डी.ए वाढ जानेवारी पगार / पेन्शन देयकासोबत ..

Spread the love

@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ State employees/pensioners to get 58% DA hike as per Centre along with January salary/pension payment ] : राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्र सरकारप्रमाणे 58 टक्के दराने महागाई भत्ता वाढ माहे जानेवारीच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत प्राप्त होणार आहे .

प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2025 पासुन 58 टक्के दराने डी.ए वाढ लागु आहे . त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखिल दि.01.07.2025 पासुन डी.ए वाढ निर्धारित आहे .

3 टक्के डी.ए वाढ : दि.01.07.2025 पासुन केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना 3 टक्के डी.ए वाढ , महागाई भत्ता थकबाकीसह लागु करण्यात येणार आहे .

जानेवारी पेड इन फेब्रुवारी : सुत्रानुसार प्राप्त माहीतीनुसार , सदर जुलैची डी.ए वाढ बाबतच्या प्रस्तावाला पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत मंजूरी प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे . ज्यामुळे माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी पगार / पेन्शन देयकासोबत डी.ए वाढीचा प्रत्यक्ष लाभ अदा केला जाईल .

एकुण डी.ए 58 टक्के : सदर जुलै मधील 3 टक्के डी.ए वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा केंद्र सरकारच्या धर्तीवर 58 टक्के इतका होईल .

Leave a Comment