सुंदर / गोरे दिसण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय ; चेहरा दिसेल नेहमी उजळून !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपणांस नेहमी सुंदर /गोरा दिसवा असे वाटते , याकरीता आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो , जर आपण गोरा दिसण्यासाठी केमिकल युक्त क्रिमचा वापर करत असाल तर , आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला कालांतराने इन्फेक्शनचा त्रास उद्भवू शकतो . यामुळे सुंदर दिसण्याकरीता अनेक घरगुती उपाय आहेत , त्यांचा वापर करणे अधिक फायदेशिर असेल .

कोणता आहे , घरगुती उपाय : यांमध्ये सर्वात सोपा व घरांमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तुंपासुन उपाय तयार करु शकता .यांमध्ये बेसन पीठ , थोडसे टमाटे रस , लिंबू रस , प्रमाणानुसार हळद , दुध यांचे मिश्रण तयार करावेत , हे मिश्रण हलकेसे पातळ होईल अशा प्रमाणात पाणी मिक्स करावेत . त्यानंतर 15 मिनिटे थांबावेत ..

चेहऱ्यावर कसे लावावे ? हे तयार झालेले मिश्रण संपुर्ण चेहऱ्यावर लेप येईल अशा पद्धतीने लावावेत .व हा लेप कमीत कमी 30 मिनिटे चेहऱ्यावर ठेवावा , त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावेत , त्यानंतर आपला चेहरा अत्यंत स्वच्छ व सुंदर दिसेल , आपला चेहरा पहिल्या पेक्षा अधिक उजाळून दिसेल . अशा प्रकारे आठवड्यातुन 3-4 वेळा केल्यास आपला चेहरा अत्यंत गोरा होईल .

दुसरा उपाय : कोरफड हे आपल्याकडे ( ग्रामीण / शहरी भागात ) सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे . जी सर्वात जास्त लाभदायक आहे , कोरफड मधील गरा काढून त्यात थोडी हळद टाकावी , व ते मिक्स केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावावेत , कोरफड मुळे चेहरा मऊ व सुंदर होण्यास मदत होते , कोरफड रोज जरी चेहऱ्यावर लावली तर कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत .

आपण वापरत असलेल्या फेशल वॉश मध्ये कोरफडचा वापर केलेला असतो . यामुळे फेशल वॉश वापरण्यापेक्षा आपल्याला सहज उपलब्ध होणारी कोरफडचा वापर करावा .. ज्यामुळे आपल्याला थोडा उशिरा फायदा होईल , परंतु चेहरा कायमस्वरुपी सुंदर व मऊ होण्यास फायदा होईल .

Leave a Comment