@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ shivasena thakare group jahirnama] : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणूकच्या अनुषंगाने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे . सदर जाहीरनामांमध्ये विविध घटकांकरिता (नागरिक / महीला / कर्मचारी) विशेष तरतूद करण्यात आलेली आहे .
यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभा करण्याचे जाहीरनाम्यात तरतूद करण्यात आली आहे . याशिवाय शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता डाळ , तांदूळ , गहू , साखर , तेल अशा पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच (05) वर्ष स्थिर ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे .
त्याचबरोबर महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवण्यात येईल , या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र 24 तास सुरू राहणारे , महिला पोलीस ठाणे सुरू करण्यात येईल . याशिवाय अंगणवाडी सेविका व अशा स्वयंसेविका यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला 25 लाखापर्यंतची कॅशलेस मेडिकल सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे . याशिवाय राज्यातील प्रत्येक मुला / मुलींना जातिभेद न करता मोफत शिक्षण देण्यात येईल , याशिवाय विकेल ते पिकेल या धोरणानुसार शेतकऱ्यांना विशेष सवलत मिळवून देण्याची तरतूद केली गेली आहे .
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष तरतूद : यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार जुनी पेन्शन (Old pension ) योजना जशाच्या तसे लागू करण्याची , तरतूद सदर जाहीरनाम्यामध्ये केली गेली आहे .

- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !