@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Savitribai fule scholarship amount increase ] : इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांच्या रक्कमेत वाढ करणेबाबत , राज्य शासनांकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार राज्यातील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेत तब्बल तिप्पटीने वाढ करण्यात आलेली आहे .
शिष्यवृत्तीचे नाव : सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ( Savitribai Fule scholarship scheme )
कोणत्या विभागामार्फत दिली जाते : सदरची शिष्यवृत्ती ही राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य विभागामार्फत ( Department ) देण्यात येते .
शिष्यवृत्तीचे स्वरुप : इतर मागास प्रवर्गातील इ.5 वी ते 7 वी मध्ये शिकण घेणाऱ्या फक्त मुलींना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात 60 रुपये वरुन 250/- प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे .
तर विभाभज , विमाप्र व इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक स्वरुपात दिली जाणाऱ्या 100/- रक्कमेत 300/- रुपये प्रतिमहा अशी वाढ करण्यात आलेली आहे .
अर्ज प्रक्रिया : सदर शिष्यवत्तीचा लाभ घेण्याकरीता आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा , अथवा आपल्या जिल्ह्याच्या संबंधित प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधावा ..
सदर शिष्यवृत्ती मुळे शिक्षण प्रभावामध्ये मुलींचे गळतीचे प्रमाणे झपाट्याने कमी होताना दिसून आले .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !