@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state pesha padabharati shasan nirnay gr ] : राज्य शासनांने पेसा पदभरती बाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.05.10.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार , राज्यातील अनुसूचित क्षेत्रांमधील ( पेसा ) 17 संवर्ग मधील सरळसेवेची पदे हे मानधन तत्वावर भरण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे .
सदरच्या निर्णयानुसार राज्यातील पेसा क्षेत्रांमध्ये एक वर्षापेक्षा अधिक वर्षे रिक्त असलेल्या पदांवर तातडीने पदभरती करण्यास मंजूरी दिली असून , सदर पदांवर विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर पदभरती करण्यात येणार आहेत .
सदर मानधन तत्वावरील पदभरती करीता प्रशासकीय मंजूरी मिळाली असून , त्याकरीता अनुसुचित क्षेत्रांमधील ( पेसा ) 17 संवर्गातील पदांवर विशष बाब म्हणून पात्र उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे .
सदर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक मानधन अदा केले जाणार आहेत , तर सदर उमेदवारांना आदेश देताना विशेष अनुज्ञा याचिका 22109/2023 च्या निर्णयाच्या अधिन राहून दिली जावी , अशी तरतुद करण्यात आलेली आहे .
मासिक मानधन हे राज्य शासनांच्या किमान वेतन आधारित असेल , त्याचा उल्लेख आदेशात केला जाईल . सदरचे पदे हे ग्राम पातळीवरील 17 संवर्गातील पदांवरच मानधन तत्वावर पदभरती केली जाणार आहे .
अंदाजित ग्राम पातळीवर अद्यायप 6931 पदे मागील वर्षांपासून रिक्त आहेत , यांमध्ये आदिवासी भागातील अंगणवाडी , प्राथमिक सुविधा , ग्रामीण विकास , गावांमधील शिक्षण , अंगणवाडी इ. विभागांमधील रिक्त पदांवर मानधनावर पदभरती केली जाईल .


- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025