दि.24 व 25 डिसेंबर रोजी राज्यात पावसाची शक्यता ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Rain update news dated 24 to 25 December ] : राज्यामध्ये दिनांक 24 व 25 डिसेंबर रोजी काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . या संदर्भात भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

राज्यांमध्ये तापमान काहीसा ओसरल्याचे दिसून येत असल्याने , पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टामुळे पुढील 48 तासांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

देशात ईशान्य राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहेत , तर याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढील 02 दिवस काही भागांमध्ये किरकोळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

या भागात पावसाची शक्यता : राज्यात पुढील 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र व मराठवाडा मधील काही भागात किरकोळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

दिनांक 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर या काळामध्ये राज्यभर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ,  याशिवाय दिनांक 26 ते 28 डिसेंबर या काळात देखिल पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

Leave a Comment