@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some major events of May 5th ] : दिनांक 05 मे 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी आपण या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात ..
बारावी बोर्ड परीक्षा निकाल : काल दिनांक 05 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला , यांमध्ये कोकण विभागाचा 96.74 टक्के , पुणे विभागाचा 91.32 टक्के , कोल्हापुर विभागाचा 93.64 टक्के , अमरावती विभागाचा 91.43 टक्के , छ.संभाजीनगर विभागाचा 92.24 टक्के , नाशिक विभागाचा 91.31 टक्के , लातुर विभागाचा 89.46 टक्के , नागपुर विभागाचा 90.52 टक्के असा निकाल लागला आहे .
मुंबई – बंगळूर नवा महामार्ग : मुंबई – बंगळूर असा नवा महामार्ग बांधला जात आहे , हा महामार्ग पुणे रिंगरोडला जोडला जाणार आहे . या नवा महामार्ग मुळे मुंबई ते बंगळूरचा प्रवास 18 तासावरुन 6 तासात पुर्ण करता येणार आहे .
भारत – पाकिस्थानच्या वाढत्या तणावात हे मोठे देश भारतासोबत : सध्या भारत – पाकिस्थान मध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे . भारताने पाकिस्थानवर मोठ्या कारवाया करत आहे , यामुळे पाकिस्थान मुस्लिम देशाच्या युनियन कडे मदतीसाठी धाव घेतली आहे . यांमध्ये भारतासोबत जगातील बलाढ्य देश अमेरिका , रशिया , फ्रान्स , इस्त्राईल हे देश भारताच्या बाजुने खंबीरपणे उभे आहेत .
पावसाचा इशारा : पुढील 24 तासात राज्यातील मराठवाडा , विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह किरकोळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे .
लाडक्या बहिणी योजना : लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500/- रुपये ऐवजी 2100/- रुपये देणे अशक्य असल्याचे , राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना कबुली केली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !