जुनी पेन्शन योजनाच्या मागणीकरिता राज्य कर्मचाऱ्यांचा शिर्डी येथे महा- अधिवेशन !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ old pension scheme maha adhiveshan at Shirdi ] : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यात आली आहे , जी पेन्शन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जशाच्या तसे लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे . परंतु सदर पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांचा विरोध दर्शवण्याकरिता व जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी शिर्डी येथे पेन्शन राज्य महा – अधिवेशन आयोजित करण्यात आला आहे .

केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना मध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे . परंतु सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आल्याने , कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (Old pension) प्रमाणे लाभ मिळणार नसल्याने , सदर पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे .

तर राज्य सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजना  (NPS) , युनिफाईड पेन्शन योजना व राज्य सरकारने  तयार केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना या तिन्ही पेन्शन योजनेचा अभ्यास करून ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लाभ होईल , अशी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू केली जाईल ,असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी कर्मचारी संघटनाच्या बैठकीत देण्यात आले आहे. .

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना व युनिफाईड पेन्शन योजना या सर्व प्रकारच्या योजनाला विरोध दर्शवीत , जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मोठी मागणी केली जात आहे .

याकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे पेन्शन राज्य महा- अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे . तरी सदर पेन्शन महा- अधिवेशनास राज्यातील कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आव्हान सदर संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे .

Leave a Comment