@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ pakisthan search big resources in see] : पाकिस्तान देश नेहमीच दहशतवाद्यांचा देश म्हणून ओळखला जातो , परंतु याच देशाला समुद्रामध्ये असे काही सापडले आहे की , हा देश सौदी अरेबिया सारख्या नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न राष्ट्र होण्याच्या तयारी करीत आहे . कारण या देशाला समुद्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पेट्रोलियम , गॅसेसचे साठे सापडले आहेत . जे की सौदी अरेबिया देशासारखे प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्याचे वृत्त समोर येत आहे .
पाकिस्तानने समुद्रामध्ये आपल्या मित्र राष्ट्रांच्या मदतीने समुद्रामध्ये नैसर्गिक पेट्रोलियम , गॅसेसचा शोध घेत होते , याकरिता भौगोलिक सर्व्हे करण्यात आला , याकरिता तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला गेला . पाकिस्तानच्या समुद्री सीमा भागामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात असल्याचे , सदर सर्वे मध्ये नमूद करण्यात आली आहेत . जे की पाकिस्तानला सौदी अरेबिया सारख्या कच्च्या तेलाचे मोठे साठे असणाऱ्या यादीमध्ये स्थान मिळवून देणार आहे .
परंतु याकरिता पाकिस्तानकडे सदर कच्चे तेल काढण्याकरिता प्रगत अशी तंत्रज्ञाने नसल्याने सौदी अरेबिया सारख्या देशांची मदत घेतली जाऊ शकते . याकरिता ड्रिलिंग प्रक्रिया करिता आणखीन एखादा वर्ष लागू शकेल , असा अंदाज तज्ञांकडून वर्तवल्या जात आहे . सदर मिळालेल्या माहितीनुसार सदर कच्च्या तेलाचे साठे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की , हे साठे जगातील चौथ्या नंबरचे साठे ठरू शकते .
यामुळेच पाकिस्तानला जगामध्ये श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही , सदर साधन संपत्ती काढण्याकरिता पाकिस्तानकडून चीन देशाची मदत घेतली जाऊ शकते . ज्यामध्ये चीन 50% पाकिस्तानला तर 50 टक्के स्वतः सदर साधन संपत्तीचा वापर करेल . परंतु पाकिस्तानने सदर नैसर्गिक पेट्रोलियम , गॅसेस काढण्यासाठी स्वतःचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केल्यास , पाकिस्तान देशाची आर्थिक स्थिती अरब राष्ट्रासारखी श्रीमंत होईल , असा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे .
हे नैसर्गिक पेट्रोलियम काढण्याकरिता पाकिस्तानला तब्बल पाच अब्ज डॉलरची गुंतवणुक करावी लागणार आहे . या संसाधनामुळे पाकिस्तान देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास चांगला हातभार लागेल.
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शन बाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित दि.10.06.2025
- राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन रोजी घेण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !