विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना सन 2022 च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टी निकष बाहेरील नुकसान भरपाईसाठी मदत निधी जाहीर ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ nukasan bharapai madat nidhi shasan nirnay ] : विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांन सन 2022 च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टी निकषाबाहेरील  झालेल्या नुकसान भरपाईकरीता मदत निधी जाहीर करणेबाबत , राज्य शासनांच्या महसुल व वन विभाग मार्फत दिनांक 10.09.2024 रोजी GR निर्गमित झालेला आहे .

सदर जीआर नुसार , सन 2022 च्या पावसाळी हंगाम मधील सतत पडणाऱ्या पावसांमुळे अतिवृष्टीच्या निकष बाहेरील झालेल्या पिकांच्या नुकसानीकरीता राज्य शासनांच्या महसुल विभागाच्या दिनांक 20.06.2023 रोजीच्या निर्णयानुसार , राज्यातील पुढे नमुद करण्यात आलेल्या चार जिल्ह्यांकरीता एकुण 48094.60 लक्ष इतका निधी वितरण करण्यास राज्य महसुल विभागांकडून मंजूरी दिली गेली आहे .

यांमध्ये अहमदनगर , परभणी , वाशिम , अमरावती या चार जिल्ह्यांना 61672.08 लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . सदर चार जिल्हानिहाय वितरीत करण्यात आलेली निधी पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रजिल्ह्याचे नाववितरीत निधी ( रुपये लक्षमध्ये )
01.अहमदनगर30199.31
02.अमरावती12977.42
03.परभणी15277.75
04.वाशिम3217.60

वरील तक्यांमध्ये नमुद केल्याप्रमाणे मदत निधी वितरीत करण्यात आलेली आहे , सदरचा निधी हा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , वाटप करण्यात आलेल्या लाभार्थीचे नाव व नीतीचा तपशील आपल्या संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवर पब्लिश करण्याची निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment