@marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees sudharit ashvasit pragati yojana] : राज्य अधिकारी / कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोगानुसार , तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यासाठी , विभागीय पदोन्नती समिती गठित करण्याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिव्यांग व कल्याण विभागाकडून दि. 10.09. 2024 रोजी महत्त्वपूर्ण GR निर्गमित केला आहे .
कार्यालयीन आदेश : राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक 2 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णय नुसार , राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता सातवा वेतन आयोगाच्या कार्य काळामध्ये दहा , वीस व तीस वर्षांच्या नियमित सेवा कालावधीनंतर 03 लाभांच्या सुधारित (sudharit ) सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( ashvasit pragati yojana) दिनांक 1.01.2016 पासून अमलात आणण्यात आली आहे .
सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक चार अ नुसार तीन लाभांच्या योजनेच्या लाभार्थ्यास पदोन्नतीच्या पदाकरिता विहित केलेली शैक्षणिक अहर्ता , पात्रता , सेवा जेष्ठता , अहर्ता परीक्षा , विभागीय परीक्षा उत्तीर्ण असणे , तसेच विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरणे प्रलंबित नसणे , तसेच गोपनीय अहवालाची प्रतवारी त्याचबरोबर यथास्थिती जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असणे अशा पद्धतीच्या कार्यपद्धतीची विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पूर्तता करणे आवश्यक असणार आहेत .
यानुसार राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण हा सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार नव्याने निर्माण करण्यात आलेला असून , आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्याकरिता सदर विभागातील पात्र अधिकारी / कर्मचारी यांची शिफारस करण्याकरिता सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार सहसचिव आस्थापना यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पदोन्नती समिती गठित करण्यात आलेली आहे . यामध्ये अवर सचिव , अवर सचिव मागासवर्गीयांचे प्रतिनिधी तसेच कक्ष अधिकारी आस्थापना अशा तीन सदस्य समिती गठित करण्यात आलेली आहे.
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025