NSP : एनएसपी नॅशनल मीन्स कम मेरिट शिष्यवृत्ती योजना अंतर्गत , 12000/- रुपये शिष्यवृत्ती रक्कम .

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ nsp national means merit scholarship scheme ] : एमएसपी नॅशनल मीन्स कम मेरिट शिष्यवृत्ती योजना अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा 1000/- रुपये प्रति वर्ष करीता 12,000/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते . सदरची शिष्यवृत्ती ही सरकारी / सरकारी अनुदानित तसेच स्थानिक संस्था शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिली जाते .

पात्रता : विद्यार्थी हा भारतीय नागरिक तसेच सदर विद्यार्थी हा भारतातील कोणत्याही शासकीय / अनुदानित / स्थानिक संस्था मध्ये इ.9 वी मध्ये प्रवेश घेतले असावेत . तसेच सदर विद्यार्थ्यांस इ.8 वी मध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ( यांमध्ये SC / ST विद्यार्थी करीता गुणांमध्ये 5 टक्क्यांची सवलत दिली जाईल ) .

तसेच विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 3.5 लाखापेक्षा कमी असावेत .. तसेच सदर शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 12 वी पर्यंत लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थी हा 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावेत ..

शिष्यवृत्ती स्वरुप : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रति वर्षी 12,000/- रुपये ( प्रति महा 1000/- रुपये प्रमाणे ) दिले जातील .

कोणत्या कागपत्रांची आवश्यक आहे : मागील वर्षाचे गुणपत्रक

  • जात प्रमाणपत्र , उत्तन्नाचा दाखला , आधार कार्ड , बँक पासबुक , अपंगत्व असल्यास प्रमाणपत्र .

अर्ज करण्याची पद्धत : पात्र विद्यार्थ्यांनी buddy4study.com या संकेतस्थळावर दि.31.10.2024 पर्यंत अर्ज करायचे आहेत , अर्जाची पडताळणी प्रक्रिया ही दि.15 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे .  

Leave a Comment