@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ mukyamantri ladaki bahin yojana get benefit to unmarried girls ] : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील अविवाहीत महिलांना देखिला लाभ प्राप्त होणार आहे , यापुर्वी केवळ विवाहीत महिलांनाच लाभ देण्याचे तरतुद होती , परंतु आता सुधारित तरतुदीनुसार आता अविवाहीत मुलांना देखिल या योजनांच्या माध्यमातुन लाभ लागु करण्यात आला आहे .
राज्य शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनांच्या माध्यमातुन , यापुर्वी अनेक अटी – शर्ती नमुद करण्यात आलेले होते , परंतु आता राज्य शासनांच्या महिला व बालविकास विभागांकडून बुधवारी सदर योजनांमध्ये महत्वपुर्ण बदल करण्यात आले .
अविवाहीत कोणत्या मुलीस लाभ घेता येणार ? : यांमध्ये कुटूंबातील मोठ्या अविवाहीत महिलांस , सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ देण्याची तरतुद करण्यात आली आहे , यामुळे अविवाहीतांना देखिल दिलासा मिळाला आहे .
सदर योजनांमध्ये सुधारणा : राज्यातील नागरिकांच्या मागणींनुसार सदर योजनांमध्ये बदल करुन , ज्यांचे वय वर्षे 21 ते 65 वर्षे दरम्यान वय असणाऱ्या कुटुंबामधील विवाहीत , विधवा , परित्यक्त्या , घटस्फोटित , निराधार , अविवाहीत महिला तसेच युवतीला देखिल या योजनांच्या माध्यमातुन प्रति महा 1500/- रुपयांचा लाभ अदा केला जाणार आहे .
या कागपत्रांसाठी पर्यायी कागदपत्रे : सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्याकरीता विविध आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर सदर कागपत्रे सेतु सुविधा / तहसिल कार्यालये या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणातील गर्दी पाहुन उत्पन्नाचा दाखला अनिवार्य करण्यात आला नाही . त्याऐवजी केशरी अथवा पिवळे रेशन कार्डचा वापर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पर्यायी कागदपत्रे म्हणून वापर करुन शकणार आहेत .
तसेच रहिवाशी प्रमाणपत्राकरीता 15 वर्षांपासुनचे रेशन कार्ड , मतदान कार्ड , शाळा सोडल्याचा दाखला हे पर्याय कागदपत्रे नमुद करण्यात आले आहेत . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे .