@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपल्याला जर कमी कालावधीमध्ये श्रीमंत व्हायचे असल्यास , पैशाची योग्य प्रकारे गुंतवणूक , बचत केली पाहिजे . जेणेकरून आपण कमी वयामध्ये श्रीमंत होण्याचा मार्ग अधिक सुलभतेने पार करू शकतो . याकरिता नेमके पैशाचे नियोजन कशाप्रकारे करावे , याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे पाहूया ..
अल्प परंतु नियमित बचत : आपण जर मोठी रक्कम बचत करू शकत नसाल तर , अल्प रकमेची बचत नियमितपणे केली पाहिजे . जेणेकरून दीर्घ कालावधीमध्ये ही अल्पबचतच मोठ्या रकमेमध्ये परिवर्तित होईल . तर त्यापासून प्राप्त होणारे व्याज यामध्ये भर पडेल . अशा प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी पोस्टल इन्शुरन्स , भारतीय आयुर्विमा तसेच विविध सरकारी योजना, बँकेमध्ये आरडी (RD ) अशा प्रकारच्या नियमित बचत योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता ..
कमाईच्या 30 टक्के रक्कम व्यवसाय वृद्धीसाठी करावे खर्च ; आपल्याकडे एखादा व्यवसाय असेल तर त्यावर निदान कमाईच्या 30% रक्कम खर्च करावे जेणेकरून आपली उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल .
कमाईचे साधने वाढवावेत ( source of Income) : आपल्याला जर लवकर श्रीमंत व्हायचे असल्यास , एका विशिष्ट व्यवसाय नोकरीवर आधारित राहून चालणार नाही , तर कमईचे वेगवेगळे सोर्स (Source ) शोधले पाहिजे , जेणेकरून आपल्या कमाईमध्ये अधिकची भर पडेल . उदा. आपण जर नोकरी करत असाल तर , साईड बिजनेस म्हणून फावल्या वेळेत चहा स्टॉल , डिलिव्हरी व्यवसाय , सुट्टीच्या दिवशी इतर ठिकाणी काम करणे अशा प्रकारचे सोर्स ऑफ इन्कम वाढवावे , जेणेकरून आपल्या संपत्ती मध्ये वाढ होण्यास सहकार्य होते .
अनावश्यक खर्च टाळावे : आपल्याला आवश्यक असलेल्या बाबीवरच खर्च करावे , अनावश्यक गोष्टीवर कोणत्याही प्रकारचा खर्च करू नये . यामुळे आपल्या संपत्तीमध्ये भर होण्यास मदत होते .
पैशाची योग्य ठिकाणीच करावी गुंतवणूक : पैशाची योग्य ठिकाणीच दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी , जसे की राष्ट्रीयकृत बँकेमध्येच पैशाची गुंतवणूक करावी , याउलट एखादी खाजगी पतसंस्था अधिक व्याजदर देत म्हणुन त्या ठिकाणी गुंतवणूक करणे टाळावेत .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !