@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटी यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलुन राज्यात मोठे आंदोलन उभे केले होते , त्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांना यश आले , त्यांना राज्यातुन मराठा समाजाचा मोठा पाठिंबा आहे . कारण त्यांना मराठा समाजाला शेवटपर्यंत न्याय मिळेपर्यंत मागे हटले नाहीत .
त्यांना राज्यातुन मराठा समाजाची मोठी साथ असल्याने , त्यांने आता लोकसभा निवडणूक 2024 मध्ये प्रत्येक मतदार संघातुन आपले उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे . याकरीता प्रत्येक जिल्ह्यातुन उमेदवारांची यादी दिनांक 30 मार्च पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहेत . या निवडणूकांमध्ये ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत .
त्यांची अंतरवाली या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे . या निवडणूकीमध्ये कार्यकर्त्यांना गावोगावी जावून निवडणूकीसाठी प्रचार , प्रसार करण्याचे कळविले आहेत . भविष्यात मराठा समाजाच्या आरक्षणाला धक्का लागून चालणार नाही , याकरीता आपले उमेदवार संसदेत असले पाहिजेत , या भावनेने निवडणूक लढविण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे .
या निवडणुकीमध्ये वैयक्तिक मनोज जरांगे पाटील हे निवणूक लढणार नसून , याबाबत समाजाने निर्णय घ्यावा अशी भावना बैठकी दरम्यान व्यक्त केली आहे . शिवाय समाजाच्या आरक्षणाला कोणताही तडा जाणार नाही , याकरीता समाजाचे नेतृत्व करणारे उमेदवार निवडून देणे आवश्यक असल्याची बाब यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी नमुद केली आहे .
शिवाय काही ठिकाणी इतर पक्षातील ज्यांनी आरक्षणाच्या वेळी सोबत होते , अशांना मदत करणार आहेत . त्याबाबत आपली भूमिका दिनांक 30 मार्चनंतर स्पष्ट करणार असल्याचे नमुद केले आहेत .