@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी : आजकाल आपण पाहतो कि , स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये ऱ्हदय विकाराचे प्रमाणे अधिक वाढले आहेत . याचे पुरुषांमधील वाढते प्रमाण , तसेच कारणे व उपाय या बाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेवूयात ..
भारतीय पुरुष मंडळी घर सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो , त्यामुळे नेहमीच पुरषांची मानसिकता अधिकच कंटाळून गेलेली असते , यांमध्ये घरचा संसार , मुलांचे शिक्षण , मुलीचे लग्न या सर्व बाबींकडे त्यांस लक्ष घालावे लागते . यांमध्ये जर स्त्रीया पुरुषांना कामांमध्ये अथवा नोकरी करत असल्यास थोडाफार हातभार लागतो .
पुरषांमध्ये ऱ्हदय विकाराचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे पुरुष मंडळी अनेक गोष्टी आपल्या मनांमध्ये साठवून ठेवतात , जे गोष्टी स्त्रीया नेहमीच आपल्या आई – वडीलांशी अथवा एखाद्या मैत्रिणींशी बोलून मोकळ्या होतात . परंतु पुरुष मंडळी मध्ये मनात गोष्टी ठेवल्याने , त्यांचा अतिरेक झाल्यास निश्चितच ऱ्हदय विकाराचे प्रमाणे वाढते .
ऱ्हदय विकाराचे प्रमाणे कमी करण्यासाठी पुरुषांसाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे ध्यान धारण होय , सकाळी व्यायाम करुन 15 – 20 मिनिटे ध्यान धारण करणे अधिक फायदेशिर राहते . तसेच पुरुष मंडळी रोजच्या कामामुळे अधिक रागीट भावना व्यक्त करतात . यामुळे रागावर नियंत्रण मिळविणे अधिक लाभदायक ठरते .
रागावर नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही गोष्टींना लगेचच प्रतिक्रया न देता , शांतपणे आपली भूमिका मांडावी .जेणेकरुन पुरुषांमध्ये ऱ्हदयविकाराचे प्रमाणे कमी होतील . स्त्रीया नेहमीच शांत राहून भूमिका स्पष्ट करतात , यामुळे स्त्रीयांमध्ये ऱ्हदय विकाराचे प्रमाणे कमी असते .
स्त्रीया आपल्या मनात काही गोष्टी न ठेवता बोलून मोकळ्या होतात , तर अनेक वेळा घरांमध्ये भांडे पटकून , तसेच मुलांना एखादी चापट मारुन राग शांत करुन टाकतात , तसेच पुरुष मंडळी मनातच काही गोष्टी दाबून ठेवतात . यामुळे पुरषांनी देखिल आपल्या एखाद्या घनिष्ठ मित्रांशी आपल्या मनातील गोष्टी सांगणे पसंत करावे . अथवा रोज दैनंदिनी ( रोजनिशी ) लिहीण्याची सवय ठेवावी . ज्यामुळे आपल्याला अधिक लाभ होईल .
वर्तमानात जगावे : अनेक जन हे भविष्य तसेच भुतकाळांमध्ये जगण्यास पसंत करतात , ज्यामुळे मानसिक त्रास होण्यास सुरुवात होते . यामुळे नेहमीच आपण वर्तमानात जगण्यास पसंत करावे , जेणेकरुन आपल्या मानसिकता उत्तम राहण्यास मदत होईल .