@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ mahayuti cm candidate Ajit Pawar ] : राज्यामध्ये महायुती पक्षात भाजपा सोबत अजित पवार गट ( राष्ट्रवादी काँग्रेस ) , शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचा समावेश आहे . पुढील महिन्यांमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुका संपन्न होणार आहेत, या अनुषंगाने महायुतीकडून मुख्यमंत्री पदाची उमेदवारी अजित पवार यांना देण्याची मोठी चर्चा रंगली आहे .
कारण अजित पवार कोणत्याही क्षणी महायुती मधून बाहेर पडू शकतील , यामुळे महायुतीकडून अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची धुरा देण्याची शक्यता आहे . कारण लोकसभा निवडणुका 2024 मध्ये महायुतीला चांगल्या पराभव स्वीकारावा लागल्याने महायुतीची सत्ता स्थापनेकरिता मोठा जोर लावण्याची शक्यता आहे .
यामधूनच अजित पवार गट बाहेर पडल्यास महायुतीची ताकद अधिकच कमी होईल , या भीतीने महायुतीकडून अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे . कारण सद्यस्थितीत महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करिता देवेंद्र फडवणीस नंतर अजित पवार या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे .
तर याउलट महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी मधील पक्षांच्या संख्याबळानुसार मुख्यमंत्री पदाची वर्णी लागेल . ज्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अधिक निवडून आल्यास , उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा देण्यात येईल . तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार अधिक निवडून आल्यास नाना पटोले यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा जाण्याची शक्यता आहे .
यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे , कारण सध्याच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांमध्ये फुटीचे राजकारण झाल्याने मतदारांना नेमके कोणत्या पक्षाला मतदान करावे याकरिता संभ्रम निर्माण झालेला आहे . तर राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना , योजनादुत तसेच लाडका भाऊ योजना अशा योजनांमुळे नागरिकांना अधिक फायदा होत असल्याने विरोधी पक्षांना निवडणुका जड जाणार हे मात्र खरे !
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !